👉शाळा सिध्दी कार्यक्रमाचा शासन
निर्णय दिनांक 30 मार्च
2016
रोजी घेण्यात आला आहे.
👉हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम
आहे.
👉समृद्ध शाळा ,गुणवत्ता विकास कार्यक्रमासह इतर
सर्व शाळा ग्रेडेशन पद्धती रद्द करण्यात आली आहे.
🎯🎯आता फ़क्त शाळा सिद्धी शाळा सिद्धी ची अधिकृत वेब साईट
शाळा सिद्धी चा GR
शाळा सिद्धी ची PPT
CLICK HERE
शाळा सिद्धी REGISTRATION PPT
DOWNLOAD
शाळा सिद्धी गुणदान तक्ता
DOWNLOAD
शाळा सिद्धी कोरा नमुना फॉर्म
DOWNLOAD
CLICK HERE
शाळा सिद्धी REGISTRATION PPT
DOWNLOAD
शाळा सिद्धी गुणदान तक्ता
DOWNLOAD
शाळा सिद्धी कोरा नमुना फॉर्म
DOWNLOAD
चला बनवू या आपली शाळा समृद्ध शाळा सिद्धी च्या माध्यमातून
शाळा सिद्धी
कार्यक्रम समजून घेऊया
शालेय
मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात समृध्द शाळा
उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांचे निर्धारकांकडून बाह्यमूल्यांकन येत्या
मार्चअखेर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे युजीसी नॅकच्या धर्तीवर
महा-सॅकच्या माध्यमातून गुणवत्तावाढीसाठी बाह्यमूल्यांकनाच्या आधारे शाळांना
मानांकन प्रदान करण्यात येणार आहे.
याविषयी सविस्तर वाचा आजच्या लक्षवेधीत - डॉ.जगदीश पाटील सर, ८१४९४९८०२०
याविषयी सविस्तर वाचा आजच्या लक्षवेधीत - डॉ.जगदीश पाटील सर, ८१४९४९८०२०
बाह्यमूल्यांकनातून
मिळणार शाळांना मानांकन
विद्यापीठ अनुदान आयोग ज्याप्रमाणे महाविद्यालयांची तपासणी करून त्यांना मानांकन प्रदान करते, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर शाळासिध्दी हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातही समृध्द शाळा या नावाने प्रायोगिक तत्वावर निवडक जि.प. शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. सध्या शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी जि.प. शाळांचा कल आयएसओ करण्याकडे आहे. महाराष्ट्रातील हजारो जि.प. शाळा आयएसओ झालेल्या आहेत. मात्र शाळा आयएसओ करण्यासाठी फी भरावी लागत असून त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसत असूनही शिक्षक मोठ्या मनाने हा भुर्दंड सहन करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे शाळासिध्दी उपक्रमांतर्गत शाळा तपासणी करून शाळांना मानांकन दिले जाऊन त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने शाळांची गुणवत्ता आपोआपच सिध्द होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जि.प. शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटक झटत आहे. डिजीटल, ज्ञानरचनावाद, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नवोपक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन, सादरीकरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, अध्ययन-अध्यापन, कृतीशील अध्ययन पध्दती यासह विविध माध्यमांतून जि.प. शाळांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. या गुणवत्तेत आणखी भर पडावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेवून शाळांची गुणवत्ता आश्वासित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्कूल असेसमेंट व ऍक्रिडिटेशन कौन्सिल (एम-सॅक) स्थापन केले आहे. त्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम राज्यात समृध्द शाळा या नावाने प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांमध्ये सुरू करण्याचे सूचित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील २०० उपक्रमशील शाळांपैकी उत्कृष्ट दोन शाळांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. या ७२ शाळांनी १० मार्चपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन म्हणजेच न्यूपा नवी दिल्ली या वेबसाईटवर ऑनलाईन स्वयंमूल्यमापन केले आहे. त्यानंतर या शाळांचे निर्धारकांकडून बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. हे बाह्यमूल्यांकन कसे करावे? यासाठी निर्धारकांसाठी पवई मुंबई येथील एमटीएनएल प्रशिक्षण केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेल्या १३३ निर्धारकांचा सहभाग होता.
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ म्हणजेच न्यूपा हे मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजेच एमएचआरडीच्या आश्रयाने शाळा मानके व मूल्यांकनाच्या कार्यक्रमाचे म्हणजे एनपीएसएसईचे नेतृत्व करीत आहे. प्रत्येक शाळेचे एक संस्थान म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने स्व-विकासाची संस्कृती विकसित करणे हे एनपीएसएसईचे ध्येय आहे. त्यामुळे शालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी शाळा मानके व मूल्यांकन आराखड्यात म्हणजेच एसएसईएफमध्ये महत्वाचे निकष म्हणून मुख्य सात क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शाळेचे सामर्थ्य स्त्रोत : उपलब्धतता, पर्याप्तता व उपयुक्तता या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील भौतिक सुविधा, मनुष्यबळ, अध्ययन-अध्यापन साहित्यांची उपलब्धतता व गुणवत्ता कशी आहे याची तपासणी शालेय आवार, क्रीडा उपकरणे व साहित्यासह मैदान, वर्गखोल्या व इतर खोल्या, वीज व विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, उतरता रस्ता, माध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली व भांडी, पेयजल, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह या बारा गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन किती परिणामकारक आहे याची तपासणी शिक्षकांना अध्ययनार्थीची जाण, शिक्षकांचे विषय व अध्यापनशास्त्रीय ज्ञान, अध्यापनाचे नियोजन, अध्ययनपूरक वातावरण निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, वर्ग व्यवस्थापन, अध्ययनार्थीचे मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन साहित्याचा वापर, शिक्षकांचे स्वत:च्या अध्यापन-अध्ययन कृतींवरील चिंतन या नऊ गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. अध्ययनार्थींची प्रगती, संपादणूक व विकास या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, अध्ययन निष्पत्तींची संपादणूक आणि सामाजिक विकास कसा आहे याची तपासणी अध्ययनार्थींची उपस्थिती, अध्ययनार्थींचा सहभाग व व्यग्रता, अध्ययनार्थींची प्रगती, अध्ययनार्थींचा वैयक्तिक व सामाजिक विकास, अध्ययनार्थींची संपादणूक या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. शिक्षक कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील शिक्षक कामगिरीचे व्यवस्थापन व विकास कसा केला जातो याची तपासणी नवीन शिक्षकांचे उद्बोधन, शिक्षकांची उपस्थिती, जबाबदारी निश्चिती व कामगिरी लक्ष्यांची निश्चिती, अभ्यासक्रम अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी, शिक्षक कामगिरीचे पर्यवेक्षण, शिक्षकांचा व्यावसायिक विकास या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. शालेय नेतृत्व व व्यवस्थापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील शालेय नेतृत्व व व्यवस्थापन कसे आहे याची तपासणी दूरदृष्टीचे विकसन व दिशा निश्चिती, बदल व सुधारणेचे नेतृत्व, अध्ययन-अध्यापनाचे नेतृत्व, शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व या चार गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. समावेशन, आरोग्य व सुरक्षा या क्षेत्राच्या माध्यमातून शाळा किती समावेशक व सुरक्षित आहे याची तपासणी समावेशन संस्कृती, विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांचे समावेशन, शारीरिक सुरक्षितता, मानसिक सुरक्षितता, आरोग्य व स्वच्छता या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. उत्पादक समाज-सहभाग या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेचे समाज अनुबंध किती उत्पादक आहेत याची तपासणी शाळा व्यवस्थापन अथवा शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन व व्यवस्थापन, शाळा सुधारणेत भूमिका, शाळा-समाज अनुबंध, अध्ययन स्त्रोत म्हणून समाज, समाज सक्षमीकरण या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. या प्रत्येक मुख्य क्षेत्राच्या मूल्यमापनात क्रमश: पायर्या येतात. या पायर्या शाळांना त्यांच्या कामगिरीच्या पातळीचा व्यावसायिक अंदाज बांधण्यासाठी एकत्रितपणे सहकार्य करतात. मूल्यमापन प्रक्रिया सुसंगत आणि पारदर्शी बनविण्यासाठी हा आराखडा महत्वाची भूमिका बजावणार आहे. शाळा मानके व मूल्यांकन आराखड्याचा भाग म्हणून शाळेस समग्र मूल्यांकन अहवाल देण्यास सुलभ व्हावे म्हणून शाळा मूल्यांकन दर्शन फलक विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये सुधारण्यासाठी अग्रक्रम ठरविलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक शाळेसाठी ई-शाळा मूल्यांकन दर्शन फलक (ई-समीक्षा) देखील विकसित करण्यात आला आहे. शाळा कामगिरीच्या माहितीचा व वक्तशीर सार शाळा मूल्यांकन दर्शन फलक पुरविणार आहे. या फलकात विद्यार्थी व शिक्षक यांची पायाभूत माहिती, नियोजित सात क्षेत्रांचे मूल्यांकन आणि शाळा सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण कृतीकार्यक्रम यांचा समावेश राहणार आहे. अशा प्रकारे शाळा मानके व मूल्यांकन आराखडा हा स्वयं व बाह्यमूल्यांकनासाठी एक धोरणात्मक साधन असून शाळा विकासासाठी आवश्यक क्षेत्र ओळखण्याचा त्याचा हेतू आहे.
अशा प्रकारे शाळांनी केलेले स्वयंमूल्यमापन, निर्धारकांकडून करण्यात आलेले बाह्यमूल्यांकन, शाळा मूल्यांकनाचा एकत्रित अहवाल या माध्यमातून संपूर्ण राज्याचा एकत्रित अहवाल आणि त्यानंतर संपूर्ण देशाचा राष्ट्रीय पातळीवरील अहवाल अशा टप्प्याटप्प्याने होणार्या प्रक्रियेतून शाळांचे मानांकन ठरविले जाणार आहे. त्यामुळे जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यास आणखी मोलाची मदत होणार आहे. समृध्द शाळा हा उपक्रम शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी लाभदायी ठरणार असल्याने शाळाविकासाचा आणखी एक टप्पा गाठला जाणार आहे. बाह्यमूल्यांकनातून शाळांना मिळणारे मानांकन ही शिक्षणक्षेत्रातील महत्वाची नांदी असून शाळांना एक प्रतिष्ठेचा दर्जा प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावण्याचे काम करणार आहे.
- डॉ.जगदीश पाटील सर, ८१४९४९८०२०

http://www.deshdoot.com/enewspapers.php?region=Jalgaon&date=&id=130711
शाळा सिद्धी ची संपूर्ण माहिती खास आपल्यासाठी आमच्या ब्लॉग वर .... चला तर म वाचूया
शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय
कार्यक्रम (NPSSE)*
भाग -1
*दूरदृष्टी*
शाळांना त्यांच्या स्व-सुधारणेत
सातत्याने व्यग्र राहण्यास सक्षम करणारे सकारात्मक पाऊल म्हणून "शाळा मानके व
मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार केलेला आहे .सर्व बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी
यांची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत आहे.त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शाळा
त्यांची कामगिरी व सुधारणकेंद्रीत गुणवत्ता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली
आहे.म्हणूनच शालेय सुधारणाकेंद्रित सर्वंकष व सर्वांगीण शालेय मूल्यांकन यंत्रणा
विकसित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन
विद्यापीठ(NUEPA)हे मनुष्यबळ विकास मंत्रालय(MHRD)च्या आश्रयाने 'शाळा मानके व मूल्यांकनाच्या
कार्यक्रमाचे 'नेतृत्व करीत आहे.NPSSE हा असा उपक्रम आहे,ज्याचे ध्येय प्रत्येक शाळेचे
एक संस्था म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने स्व विकासाची संस्कृती विकसित
करणे आहे.NPSSE हे ' शालेय मूल्यांकन' हे माध्यम आणि ' शालेय सुधारणा' हे लक्ष्य अशी कल्पना करते हा कार्यक्रम वेगवेगळ्या राज्यांमध्ये
वेगवेगळ्या नावाने राबविला गेला.जसे गुजरातच्या ' गुणोत्सव' उडीसाच्या 'समीक्षा' कर्नाटकचा 'शालेय गुणवत्ता मूल्यांकन व
प्रमाणन' आराखडा इ. सन 2015/16 पासून
महाराष्ट्रात 'समृद्ध शाळा' या नावाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
****************************** ****************************** **************************
भाग-2 *शाळा मानके व मूल्यांकन आराखडा (SSEF)* हे शाळा
मूल्यांकनाचे समावेशक साधन आहे.तो शाळांना सुयोग्य पद्धतीने निर्धारित निकषांवर
त्यांच्या निर्णायक कामगिरी क्षेत्रांचे मूल्यमापन केंद्रित व धोरणात्मक
पद्धतीने करण्यास सक्षम बनवतो.SSEF चे विकसन
राज्यस्तरीय अधिकारी,जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षण
अधिकारी,प्रशिक्षक ,शाळा प्रमुख,शिक्षक संघटना,इ.चा समावेश करून सहभागी
पद्धतीने केले आहे.
*प्रमुख वैशिष्ट्ये*-
● निर्णायक
कामगिरी क्षेत्रे म्हणून मुख्य क्षेत्रे व यांतर्गत मूल्यमापन व सुधारणेसाठी
संदर्भ बिंदू म्हणून गाभाभूत मानकांचा संच यांची निश्चिती.
● स्वयं -
मूल्यांकन व बाह्य मूल्यांकन या दोहींसाठी एक सर्वसमावेशक साधन.
● विभिन्न
शाळांची गरज लक्षात घेऊन राज्यांच्या संदर्भीकरणासाठी लवचिक व स्वीकारार्ह.
● स्पष्ट, तार्किक व शाळा आणि बाह्य मूल्यमापकांना वापरण्यास सोपे.
● मूल्यमापन
प्रकिया सुसंगत व पारदर्शी बनविणारी. *SSEF ची रचना* -
हा आराखडा एकूण मुख्य 7 क्षेत्रांचा बनलेला आहे.त्यात गाभाभूत मानकांचा संच आहे.क्षेत्र
मूल्यमापनात स्वयंस्पष्ट मार्गदर्शके,वस्तुस्थितीदर्शक
माहिती,पायाभूतमानके,आधारभूत पुरावे या
पायऱ्याआहेत.शेवटी मत नोंदवण्यासाठी प्रतिसाद तक्ता आहे.शाळा मूल्यांकन दर्शक
फलकावर प्रत्येक शाळेने एकत्रित मूल्यांकन अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.
राज्यभरातील 200 नवोक्रमशील शाळांचे
बाह्यमूल्यांकन झाले. काही दिवसात त्यातील काही 'शाळा
समृद्ध' होतील.आता या वर्षीही जवळपास 20000 नवोपक्रमशील
शाळांची निवड होऊन त्यांचेही बाह्यमूल्यांकन होणार आहे.
****************************** ****************************** *******************
भाग - 3
*प्रमुख क्षेत्र व गाभा मानके :*-
*1)शाळेचे
सामर्थ्य स्तोत्र:उपलब्धता, पर्याप्तता व उपयुक्तता*
-
★ शालेय आवार
★ क्रीडा उपकरणे व साहित्यासह
मैदान
★ वर्गखोल्या व इतर खोल्या
★ वीज व विद्युत उपकरणे
★ ग्रंथालय
★ प्रयोगशाळा
★ संगणक (जेथे तरतूद असेल तेथे)
★ उतरता रस्ता
★ मध्यान्ह भोजन,स्वयंपाक खोली व भांडी
★ पेय जल
★ हात धुण्याची सुविधा
★ स्वच्छता गृह
पहिल्या प्रमुख क्षेत्रात वरील 12 गाभा मानके स्व मूल्यांकन व बाह्य मूल्यांकनात तपासण्यात
येतात.प्रत्येक प्रमुख क्षेत्राची सुरुवात त्यातील विशिष्ट कामगिरी क्षेत्राचे
महत्व शाळेसाठी अधोरेखित करण्यासाठी संक्षिप्त प्रस्तावनेने होते.
धन्यवाद !!
****************************** ****************************** ****************************** ***
भाग - 4
◆ *प्रमुख क्षेत्र क्र.2*
*अध्ययन-अध्यापन
व मूल्यमापन* -
*गाभा
मानके* -
●शिक्षकांना
अध्ययनार्थीची जाण
●शिक्षकांचे
विषय व अध्यापनशास्रीय ज्ञान
●अध्यापनाचे
नियोजन
●अध्ययन
पूरक वातावरण निर्मिती
●अध्ययन
अध्यापन प्रक्रिया
●वर्ग
व्यवस्थापन
●अध्ययनार्थीचे
मूल्यमापन
●अध्ययन
अध्यापन साहित्याचा वापर
●शिक्षकांचे
स्वतःच्या अध्यापन अध्ययन कृतीवरील चिंतन
वरील गाभा मानकांचे स्वयं व बाह्य
मूल्यांकनात महत्वाचे स्थान आहे.प्रत्येक क्षेत्राची रचना क्रमबद्ध पद्धतीने केली
आहे.ते सूचक मार्गदर्शके,वस्तुस्थितीदर्शक माहिती,वर्णनासह गाभा मानके तसेच स्वयं व बाह्य मूल्यांकनासाठी वस्तुनिष्ठ
निवाडा करण्यासाठी आधारभूत पुरावे यांनी मिळून बनले आहे.प्रत्येक मुख्य
क्षेत्राच्या शेवटी मत नोंदविण्यासाठी प्रतिसाद तक्ता दिलेला आहे.
धन्यवाद !
****************************** ****************************** ********
भाग - 5
*प्रमुख
क्षेत्र क्र.3*
*◆अध्ययनार्थीची प्रगती,संपादणुक
व विकास* :-
◆ *गाभा मानके* -
●अध्ययनार्थींची
उपस्थिती
●अध्ययनार्थींचा
सहभाग व व्यग्रता
●अध्ययनार्थींची
प्रगती
●अध्ययनार्थींचा
वैयक्तिक व सामाजिक विकास
●अध्ययनार्थींची
संपादणूक
अशी एकूण पाच मानके या क्षेत्रात
अंतर्भूत असून त्या द्वारे स्वयं व बाह्य मूल्यांकन करणे अपेक्षित आहे.
धन्यवाद !
****************************** ****************************** **************
भाग - 6
*◆प्रमुख क्षेत्र क्र. 4*
*शिक्षक
कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन*
*◆गाभा मानके*-
● नवीन
शिक्षकांचे उद्बोधन
●शिक्षकांची
उपस्थिती
●जबाबदारी
निश्चिती व कामगिरी लक्ष्यांची निश्चिती
●अभ्यासक्रम
अपेक्षांप्रति शिक्षकांची तयारी
●शिक्षक
कामगिरीचे पर्यवेक्षण
●शिक्षकांची
व्यावसायिक विकास
प्रत्येक प्रमुख क्षेत्रांतर्गत गाभा
घटक संबंधित प्रमुख क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण आयामांना स्पर्श करतात. हि गाभा
मानके गुणवत्तेचे निदर्शक तयार करून मापनक्षम अपेक्षा निर्माण करतात आणि शाळा
मूल्यांकनास सामायिक पाया पुरवतात.हि मानके चढत्या क्रमाने तीन स्तरांवर कामगिरीची
अपेक्षित पातळी समोर ठेवतात.एखाद्या प्रमुख क्षेत्रातील समग्र सुधारणा घडवून
आणण्यासाठी लक्षात घ्यावयाचे महत्वपूर्ण घटक यामध्ये समाविष्ट होतात.सुधारणेकडे
प्रवास सुरु करणाऱ्या शाळेस गाभा मानके दिशा देतात.
धन्यवाद !!
****************************** ****************************** *********
भाग - 7
● *प्रमुख
क्षेत्र क्र.5*
■ *शालेय
नेतृत्व व व्यवस्थापन*
◆ *गाभा मानके* -
* दूरदृष्टीचे
विकसन व दिशा निश्चिती
* बदल व
सुधारणेचे नेतृत्व
* अध्ययन -
अध्यापनाचे नेतृत्व
* शालेय
व्यवस्थापनाचे नेतृत्व
● *प्रमुख
क्षेत्र क्र.6*
■ *समावेशन,आरोग्य व सुरक्षा*
◆ *गाभा मानके*-
* समावेशन
संस्कृती
* विशेष
गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे (CWSN)समावेशन
* शारीरिक
सुरक्षितता
* मानसिक
सुरक्षितता
* आरोग्य व
स्वच्छता
● *प्रमुख
क्षेत्र क्र.7*
■ *उत्पादक
समाज - सहभाग*
◆ *गाभा मानके* -
* शाळा
व्यवस्थापन / शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन व व्यवस्थापन
* शाळा
सुधारणेत भूमिका
* शाळा -
समाज अनुबंध
* अध्ययन
स्रोत म्हणून समाज
* समाज
सक्षमीकरण
अशी एकूण हि 7 प्रमुख क्षेत्र व 45 गाभा
मानके आहेत. शाळा मानके व मूल्यांकन आराखडा हा स्वयं व बाह्य मूल्यांकनासाठी एक
धोरणात्मक साधन आहे.
भाग - 8
* *स्वयं
मूल्यमापन मार्गदर्शक मुद्दे* -
● पूर्वतयारी
● पुराव्यांचे
संकलन - ◆संबंधित व्यक्तींचे म्हणणे ऐकून
नोंद घेणे.
◆ शाळा परीक्षणे
◆ वर्ग परीक्षणे
◆ माहितीचे पुनरावलोकन
●सुधारणा
करण्यासाठी बलस्थाने आणि संधीचा शोध घेणे
●सातत्यपूर्ण
सुधारणा आराखडा कार्यक्रम तयार करणे
●सातत्यपूर्ण
सुधारणा आराखडा आणि शालेय विकास आराखडा यांचा समन्वय साधणे.
* *बाह्य
मूल्यांकन मार्गदर्शक मुद्दे* -
● पूर्वतयारी
● पुराव्यांचे
संकलन -
◆ संबंधित व्यक्तींचे म्हणणे ऐकून
नोंद घेणे
◆ शाळा परीक्षणे
◆ माहितीचे पुनरावलोकन
● सुधारणा
करण्यासाठी बलस्थाने आणि संधीचा शोध घेणे
●सातत्यपूर्ण
सुधारणा कार्यक्रमाचे परीक्षण करणे
●सातत्यपूर्ण
सुधारणा आराखडा आणि शालेय विकास आराखडा यांचे परीक्षण करणे.
शाळा मूल्यांकनासाठी मार्गदर्शक
मुद्द्यांचा हेतू क्रमशः व व्यावसायिक पद्धतीने करावयाच्या स्वयं व बाह्य
मूल्यांकन प्रक्रियेस आधार देणे हा आहे.
धन्यवाद !
****************************** ****************************** ****************************** *****
भाग - 9 ◆ *शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )*
♻१.
पेपरलेस प्रशासन
♻२.
प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३.
बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
♻४.
दिवस नवा, भाषा नवी
♻५.
पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६. माझी
कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
♻७.
सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
♻८.
बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
♻९. गणित
विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
♻१०. एक
तास राष्ट्रासाठी
♻११.
भाषिक प्रयोगशाला
♻१२ .
पर्यावरण संरक्षक दल
♻१३.
सौरऊर्जा जागरुकता व वापर
♻१४. विषय
खोली
♻१५.
आम्ही स्वच्छता दूत
♻१६.
तंबाकूमूक्त शाळा
♻१७.
प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८.
विज्ञान भवन
♻१९.
मैत्री संख्यांची
♻२०.
आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
♻२१. एक
दिवस गावासाठी
♻२२. विषय
कोपरा - प्रभावी माध्यम
♻२३.
विशेष विद्यार्थी कोपरा
♻२४.
पुस्तक भिशी
♻२५.
शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
♻२६.
क्रीडा दूत
♻२७.
राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
♻२८. हरित
शाळा
♻२९.
प्रदूषण हटवा अभियान
♻३०.
चालता बोलता
♻३१. माझा
मित्र परिवार
♻३२. माझे
पूर्व ज्ञान
♻३३.
शब्दगंगा
♻३४. कौन
बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड
पॉट
♻३६.
हस्ताक्षर सुधार मोहिम
♻३७.
संख्यावरील क्रिया - एक छंद
♻३८.
प्रश्नमंजूषा
♻३९.
विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
♻४०.
बालआनंद मेळावे
♻४१.
सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२.
पुस्तक जत्रा
♻४३. फन
एंड लर्न
♻४४.
शंकापेटी
♻४५.
स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
♻४६.
रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक
तास इंटरनेट
♻४८.
गांडूळ खत निर्मिती
♻४९. Student of the day
♻५०. एक
तास मुक्त अभ्यास
♻५१.
समस्या व सूचना पेटी
♻५२.
किशोरवयीन मुलींचे शिक्षण
♻५३.
लोकसंख्या शिक्षण
♻५४.
स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५.
वाचाल तर वाचाल
♻५६.
बिखरे मोती
♻५७. Book of the day
♻५८.
विशेष व्यक्तींच्या मुलाखती
♻५९.
बालसभा
♻६०.
माझ्या गावचा इतिहास
♻६१.
परिसरातील भूरुपांची ओळख
♻६२.
विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
♻६३.
प्रयोगातून विज्ञान
♻६४.
मुक्त वाचनालय
♻६५. खरा
मित्र उपक्रम
♻६६.
गृहपाठ गट
♻६७.
टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८.
हस्तलिखित निर्मिती
♻६९.
मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
♻७०.
वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
♻७१.
व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
♻७२.
परिसर भेटीतून विज्ञान परिचय
♻७३. चला
शिकूया लघू़द्योग
♻७४.
दैनंदिनी लेखन
♻७५. नविन
अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६.
विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
♻७७.
शालेय परसबाग
♻७८.
संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९.
खेळातून गणित शिकू
♻८०.
परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व
कल्पनेतून शोध निबंध लेखन
♻८२.
सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३.
दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून
विद्यार्थी विकास
♻८५.
परिसरातील कलांची ओळख
♻८६.
गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
♻८७.
गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८.
शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
♻८९.
काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०. पाणी
व्यवस्थापन
♻९१.
बलिराजा चेतना अभियान
♻९२.
जलसाक्षरता
♻९३.
तंत्रस्नेही विद्यार्थी
♻९४. कथा
निर्मिती / चित्र कथा निर्मिती
♻९५. रेन
वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ .
पुस्तक परिचय व भेट
♻९७.
विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
♻९८ .
निर्मल शाळा अभियान
♻९९.
विविध दिन साजरे करणे.
****************************** *********
संकलन - मंदार रसाळ
9028556480
No comments:
Post a Comment
आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल