Friday 26 January 2018

कडाव शाळेतील शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान केले

सालाबादप्रमाणे कडाव शाळेतील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपताना गणतंत्र दिनानिमित्त नेताजी संघ व ग्रामस्थ मंडळ वदप या संस्थेचे सदस्य श्री.समीर तानाजी येरूनकर सर यांच्या सहकार्याने वदप गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आमचे मित्र श्री.येरूनकर सरांच्या विनंतीला मान देऊन आणि राष्ट्रीय दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी श्री. वाडीले, श्री.पवार,श्री.कोकणी श्री.रसाळ आणि श्री.कंधारे यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमात श्री.येरूनकर सरांनी त्यांच्या गावात प्लास्टिक मुक्त गाव हा अभिनव उपक्रम हाती घेतला त्या निमित्ताने त्यांनी कापडी पिशव्या प्रत्येक रक्तदात्याला भेट म्हणून देण्यात आली.
रक्तदान शिबिरास कर्जत तालुक्यातील बहुतेक शिक्षक बंधू भगिनींनी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
वदप गावातील या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत होते

प्रजासत्ताक दिन सोहळा आज कडाव शाळेत उत्साहात संपन्न पडला

रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी पारंपारिक पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा न करता यावेळी विद्यार्थी व त्यांचे विविध कवायत प्रकार तसेच चित्तथरारक मनोरे सादर केले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांची मने जिंकली
प्रजासत्ताक दिन सोहळ्याची काही क्षणचित्रे

Thursday 2 March 2017

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्ताने अंधश्रद्धा निर्मुलानाचा प्रचार व प्रसार

२८फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन होय .हा कार्यक्रम सी.व्ही  रामन यांना नोबे ल पारितोषिक १९२८ रोजी मिळाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला दिन आहे

रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कडाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सादर कार्यक्रमात अंधश्रद्धेचा भांडाफोड शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर वाडीले यांनी हातचलाखी  व विज्ञानातील जादू कार्यक्रम केले तर सुभाष कोकणी नवले बिभीषण नरेश म्हात्रे यांची  व्याख्याने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जगन पवार यांनी केले सदर कार्यक्रमाला संगीता जाधव मंगला डामसे सविता खडेसह विद्यार्थी उपस्थित होते .

Wednesday 22 February 2017

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

                  आज दिनांक १९/०२/२०१७ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंतीला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषणे करण्यात आली तसेच कुमारी आर्या जगन पवार इयत्ता चौथी हिने प्रतापगडावरील पराक्रम यावर उत्कृष्ट पोवाडा सादर केला . सर्व  शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले .... सदर बालसभेची काही क्षणचित्रे ............................