भारतीय संस्कृती आणि शाळा
आकाशकंदील
आकाश कंदील बणवण्याचा उपक्रम कडाव शाळेतील श्रि. ज्ञानेश्वर सुका वाडीले सर यांनी प्रथम शाळेत राबवला त्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत सादर केले त्यांचा उपक्रम हा जीवन शिक्षण मध्ये प्रकाशित झालेला आहे.
आकाशकंदील प्रात्यक्षिक
सदर आकाश कंदील प्रात्यक्षिक चे सादरीकरण करून दरवर्षी मुलांकडून
ते तयार करून घेण्यात येते.यातून मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळतो
.
विशेष म्हणजे हे आकाशकंदील मुलांना घरी आपल्या दारी लावण्यास
देण्यात येते . व हा खर्च सर्व वर्गशिक्षक मिळून करतात .
त्याचे काही चित्रे
रक्षाबंधन
आपली भारतीय संस्कृती जोपासता यावी व त्यातून आपल्या परंपरा ची माहिती मुलांना मिळावी. मुलामुलींमध्ये सामाजिक ऐक्य ची भावना वाढीस लागावी ह्या हेतूने शाळेमध्ये रक्षाबंधन उपक्रम राबविण्यात येतो. विशेष म्हणजे शाळेतच सर्व मुले राखी तयार करतात. यातून सर्व मुलांना स्व निर्मितीचा आनंद मिळतो .
सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
भोंडला
शाळेतील विद्यार्थ्यांना भोंडला कार्यक्रमामधील उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शिक्षक नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असताना
मनोरे
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाव येथील विद्यार्थ्यांनी सेव पालक वर्ग , मान्यवर , आणि परिसरातील नागरिक यांच्या समोर मनोरे चे प्रात्यक्षिक सादर करत सर्व उपस्थित लोकांची मने जिंकुन घेतली.
वृक्षारोपण
एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू .... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ... झाडे लावा ,झाडे जगवा ... या आणि अशा अनेक पर्यावरणीय पोषक गोष्टी साठी शाळेच्या वतीने आपला मोठा सहभाग दिला जात आहे ... दरवर्षी फक्त उपक्रम म्हणून काम न करता झाडे जगावी ह्यासाठी सुद्धा मेहनत घेतली जाते... म्हणून तर आज शाळेच्या आवारात हिरव्या गर्द झाडांची दाट सावली असते . त्याचेच काही क्षणचित्रे
No comments:
Post a Comment
आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल