वाचन आणि पुस्तके
मोफत पुस्तके pdf वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे.
आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. आज जर त्यांचा वर्तमान चांगला असेल; तर देशाचे पुढील भविष्यही चांगलेच असेल. त्यासाठी लहान मुलांना चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांना वाचनाची सवयी लागणे अगत्याचे आहे.
एकदा एक व्यक्ती इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या घरात गेली घरातील इतस्तत: पडलेली भरपूर पुस्तके पाहून त्यांनी ती बुकशेल्फ मध्ये का ठेवली नाही अशी विचारणा केली ? तेव्हा ते लेखक म्हणाले - ज्या मार्गान मी ही पुस्तके जमविली आहेत, त्या मार्गाने बुकशेल्फ जमवायला गेलो तर तुरुंगात जाईन मी. याचा अर्थ त्यांनी बरीच पुस्तके ग्रंथालयातून चोरून आणून आपला वाचनाचा छंद जोपासला होता हे यावरून लक्षात येते.
No comments:
Post a Comment
आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल