कडाव ऐतिहासिक महत्व

!! कडाव !!

  
               दक्षिण भारताची यात्रा करत असताना कडाव येथे गणेशभक्त श्रीमानयोगी "कण्व ऋषी" काही दिवसांसाठी कडाव मुक्कामी होते. त्यावेळी आपल्या उपासनेमध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी बालगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्रीमानयोगी ऋषी "कण्व " या शब्दाचा अपभ्रंश होऊन "कडाव" हे नाव झाले. तेव्हापासून कडावला बालदिगम्बराचे कडाव म्हणून ओळखले अशी दंतकथा आहे. 
                भिवंडी किल्ला ते राजमाची असा राजमार्गावर नसरापूर हे मध्ययुगीन परगणा होते. त्यातील कसबाचे ठिकाण कडाव असल्याने येथे व्यापारी उद्देशाने गावाचा विकास झाला. परंतु परिसरातील व्यापारी केंद्र असल्याने गावाचा वाढता आलेख होता. आता परिसरातील बाजारपेठेचे बाजारपेठेचे गाव आहे.                                                                                            गावात ऐतिहासिक तळे असून त्याच्या मध्यभागी प्राचीन लाकडी खांब होता. सध्या तो अस्तित्वात नाही. गावात बाल दिगंबर मंदिर, राममंदिर,ग्रामदैवत,बौद्ध विहार व मस्जिद आहे. हिंदू,बौद्ध ,मुस्लिम असे सर्वच समाजाच्जी लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. 
               संपूर्ण रेगड जिल्ह्याला भुरळ पाडणारी शिवजयंती (तीथी प्रमाणे) कडाव गावातच साजरी होते. गावात १ ते ७ जि.प. शाळा तसेच ८ ते १० गजानन माध्यमिक विद्यालय आहे. 
               कडाव हे गाव कर्जत मुरबाड रस्त्यावर कर्जत पासून ८.४ कि . मि. तर मुरबाडपासून ४१ कि.मी. आहे, मुंबईकर भीमाशंकर जाताना जवळचा मार्ग हा कडाव गावातून जातो.

No comments:

Post a Comment

आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल