Friday, 26 January 2018

कडाव शाळेतील शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान केले

सालाबादप्रमाणे कडाव शाळेतील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपताना गणतंत्र दिनानिमित्त नेताजी संघ व ग्रामस्थ मंडळ वदप या संस्थेचे सदस्य श्री.समीर तानाजी येरूनकर सर यांच्या सहकार्याने वदप गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आमचे मित्र श्री.येरूनकर सरांच्या विनंतीला मान देऊन आणि राष्ट्रीय दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी श्री. वाडीले, श्री.पवार,श्री.कोकणी श्री.रसाळ आणि श्री.कंधारे यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमात श्री.येरूनकर सरांनी त्यांच्या गावात प्लास्टिक मुक्त गाव हा अभिनव उपक्रम हाती घेतला त्या निमित्ताने त्यांनी कापडी पिशव्या प्रत्येक रक्तदात्याला भेट म्हणून देण्यात आली.
रक्तदान शिबिरास कर्जत तालुक्यातील बहुतेक शिक्षक बंधू भगिनींनी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
वदप गावातील या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत होते

प्रजासत्ताक दिन सोहळा आज कडाव शाळेत उत्साहात संपन्न पडला

रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी पारंपारिक पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा न करता यावेळी विद्यार्थी व त्यांचे विविध कवायत प्रकार तसेच चित्तथरारक मनोरे सादर केले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांची मने जिंकली
प्रजासत्ताक दिन सोहळ्याची काही क्षणचित्रे