आज दिनांक ०६/०१/१७ रोजी शिखर संस्थेचे प्रमुख प्राचार्य मा. श्री.Dr. गजानन पाटील यांची प्रेरणा कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली. सदर सभेत मार्गदर्शन करताना मा.श्री.गजानन पाटील....
सदर शिबिरास कर्जत तालुक्याचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.डंबाये साहेब , विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,गट समन्वयक ,साधनव्यक्ती, सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक हजर होते.कार्यक्रमाची धुरा नुकत्याच पनवेल DICPED येथे रुजू झालेल्या श्रीमती. अष्टेकर या सांभाळत होत्या . त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
सदर कार्यशाळेत वैजनाथ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सोनावणे सरांनी ज्ञानरचनावादावर आधारित कृतीपुस्तीकेचे अनावरण मा. पाटील साहेबांच्या हस्ते केले. थोडक्यात त्या पुस्तिकेचे महत्व आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. वैजनाथ केंद्रातीलाच श्री. शाम पवार यांनी बोलीभाषेतील एक कृतिसंशोधन सादर करून बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यात मेळ घालण्यासाठी शब्द भांडार तयार केलेली एक पुस्तिकेचे अनावरण सुद्धा त्यांनी मा. पाटील साहेब यांच्या हस्ते केले.
दहिवली केंद्र, भिसेगाव केंद्र यांच्या केंद्रप्रमुख यांनी आणि शिक्षकांनी मिळून DICPED पनवेल साठी काही मदत निधी मा. श्री. पाटील साहेबांना सुपूर्द केला.दोन्ही केंद्रातील शिक्षकांना अभिनंदन करण्यात आले.
कडाव शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्याने अथक प्रयत्न करून कोणत्याही प्रशिक्षणा शिवाय शाळेचा एक शैक्षणिक ब्लॉग तयार केला. या विषयी कडाव शाळेतील शिक्षक श्री. मंदार रसाळ यांनी सर्वांना विस्तृत माहिती दिली.
त्यानंतर DICPED चे अधिक्षक साहेबांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत परिपत्रकातील २५ मुद्यांवर वर चर्चा घडवून आणली आणि सखोल मार्गदर्शन केले. समस्यांचे निराकरण केले.
म.श्री.पाटील साहेबांनी नेहमीच्या खास शैलीत आपले अनुभव सांगत मार्गदर्शनाला सुरुवात केली. शिक्षकांच्या समस्या आणि मार्गदर्शन केले. साहेबांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.
त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
अ,ब,क, सूत्र
१) अ म्हणजे अनुभूती द्या.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्या.गाणी गोष्टी कविता स्वतः तयार करू द्या. अनुभूती मिळण्यासाठीच ज्ञानरचनावादाचा उदय झाला.मुले विविध प्रकारे अभिव्यक्त होतात. त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी द्या.
२) ब म्हणजे बदल घडवा
स्वयंप्रेरित व्हा, बदल घडवा. स्वतः मध्ये, मुलांमध्ये आणि शाळेमध्ये सकारात्मक बदल घडवा .
३) क म्हणजे कर्तव्य पार पाडा.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र परिपत्रक अन्वये असलेली कर्तव्ये पार पाडा. स्वतःशी प्रामाणिक राहा.
सरते शेवटी त्यांनी एवढेच सांगितले कि ज्या व्यक्तीचा विश्वास स्वतःवर असतो तो सर्वांवर विश्वास टाकू शकतो.........
चैतन्यपूर्ण आणि खरोखरच प्रेरणादायी असे मार्गदर्शन शिक्षकांसाठी पर्वणीच ठरली.
No comments:
Post a Comment
आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल